पुणे – शहरात मागील दोन दिवसांपासून बाधित संख्या 600च्या खाली असून शुक्रवारी (दि. 28) नव्याने 573 बाधितांची नोंद झाली. तर 999 बाधित करोनामुक्त झाले. दरम्यान, शहरात मागील आठ दिवसात गंभीर रुग्णांमध्ये 334 तर ऑक्सिजनवरील रुग्णसंख्येत 2 हजार 592ने घट झाली आहे. या आठ दिवसांत 290 जणांचा मृत्युची नोंद झाली आहे.
पुणे शहरातील आजचा रुग्ण बाधित दर 7 टक्के इतका आहे. आज, दिवसभरात 8 हजार 200 संशयितांची नमुने तपासणी करण्यात आली आहे. तर आतापर्यंत 24 लाख 76 हजार 909 नमुने तपासणीतून 4 लाख 68 हजार 702 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एकूण बाधितांपैकी 4 लाख 52 हजार 990 व्यक्ती करोनामुक्त झाले आहेत.
आठ दिवसांपासून बाधित संख्येबरोबरच ऑक्सिजनवरील आणि गंभीर रुग्णांची संख्या काहिशी घटली असून, गंभीर रुग्णाच्या मृत्युचे प्रमाण अधिक आहे. आठ दिवसांपूर्वी 1 हजार 315 बाधित गंभीर (व्हेंटिलेटर) होते. तर 4 हजार 279 जणांना ऑक्सिजन लावण्यात आला आहे. आज, गंभीर रुग्णांची संख्या 981 तर ऑक्सिजनवरील रुग्णसंख्या 1 हजार 687 इतकी आहे. या आठ दिवसात 290 जणांचा मृत्युची नोंद झाली असून, दररोज 37 ते 41 मृत्यू होत आहे.