पुणे -शहरात शनिवारी नव्याने 199 करोनाबाधित सापडले. तर, 391 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तसेच, 10 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामध्ये शहर हद्दितील 5 जणांचा समावेश आहे.
शहरात दिवसभरात 10 हजार 94 जणांच्या नमुने तपासणीतून 199 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शनिवारचा बाधित दर 1.98 टक्के इतका आहे. दरम्यान, आतापर्यंत तब्बल 31 लाख 72 हजार 56 जणांच्या नमुने तपासणीतून 4 लाख 96 हजार 543 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यातील 4 लाख 85 हजार 287 जण करोनामुक्त झाले, तर 8 हजार 945 जणांचा मृत्यू झाला.
शहरातील एकूण बाधित दर 15.65, तर करोनामुक्तीचा दर 97.73 टक्के इतका आहे. शहरातील आतापर्यंतचा मृत्यूदर 1.80 टक्के इतका आहे. दरम्यान, शहरात सक्रिय बाधित संख्या 2 हजार 311 असून, त्यातील 207 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 291 बाधितांना ऑक्सिजन लावण्यात आला आहे.