प्रसिद्ध खेळाडू, राजकीय नेते, अभिनेत्यावर बायोपिक बनवले जाऊ लागले आहेत. त्यातच आता अचानक प्रकाश झोतात आलेल्या कलाकारांवरही बायोपिक बनवले जाऊ लागले आहेत. अशाच व्यक्तींपैकी एक आहे रानू मंडल. पश्चिम बंगालमधील रानाघाटमधील रानू मंडल अशीच एक गायिका आहे.
रेल्वे स्टेशनवर “एक प्यार का नगमा है’ हे गाणे गात असतानाचा तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर तिचे आयुष्यच बदलून गेले. हा व्हायरल झालेला व्हिडीओ बघून देशातील काही प्रसिद्ध संगीतकारांनी रानू मंडल मंडल ची दखल घेतली होती. हिमेश रेशमियांने 2020 मध्ये “हॅपी हार्डी ऍन्ड हीर’ या सिनेमासाठी पार्श्वगायन करण्याची संधी तिला दिली होती.
याशिवाय काही रिऍलिटी शो मध्येही ती सहभागी झाली होती. मात्र तिला अचानक मिळालेली ही प्रसिद्धी फारच थोडे दिवस टिकली. आता रानू मंडलची ही कहाणी लवकरच बायोपिकच्या स्वरूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.
ऋषिकेश मंडलनी या बायोपिकचे डायरेक्शन केले आहे आणि रानू मंडलचा लीड रोल इशिका डे हिने साकारला आहे. या बायोपिकचे नाव “मिस रानू मारिया’ असे असणार आहे.