प्रचारमंत्री; मोदींना दिले विरोधकांनी नवे नाव

लखनौ -लोकसभा निवडणुकीच्या प्रचारधुमाळीत विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवे नाव दिले आहे. त्यांचा उल्लेख विरोधकांनी प्रचारमंत्री असा केला आहे.

उत्तरप्रदेशातील एका सभेत बोलताना समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले. देशाला प्रचारमंत्र्याची नव्हे; तर प्रधानमंत्र्याची (पंतप्रधान) गरज आहे, असे अखिलेश म्हणाले. कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ट्‌विटरवरून मोदींना लक्ष्य करताना त्यांचा उल्लेख प्रधान प्रचारमंत्री म्हणून केला.

मोदी उद्या (गुरूवार) प्रचारासाठी उत्तरप्रदेशच्या बुंदेलखंड विभागाचा दौरा करणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर बांद्यातील रस्ते पाण्याने धुवूून स्वच्छ करण्यात आले. त्याचा संदर्भ प्रियंका यांनी ट्विटमध्ये दिला. प्रधान प्रचारमंत्र्यांच्या स्वागतासाठी रस्ते चकाचक करण्याच्या उद्देशातून पाण्याचे टॅंकर्स वापरण्यात आले. संपूर्ण बुंदेलखंड दुष्काळात होरपळून निघत असताना भाजपकडून पिण्याचे पाणी वाया घालवले जात आहे. मोदी चौकीदार आहेत की दिल्लीहून येणारे शहेनशाह, असा सवाल प्रियंका यांनी केला. अखिलेश आणि प्रियंका यांनी वापरलेल्या प्रचारमंत्री या शब्दाचा उल्लेख इतर विरोधकांकडूनही होण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.