मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’च्या सुधारीत आवृत्तीचे आज प्रकाशन करण्यात आले आहे. पहाटेचा शपथविधी आणि जून महिन्यातील सत्तांतर याबदद्ल पवारांनी काय भाष्य केले आहे, याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यासोबतच महाविकास आघाडीच्या स्थापनेबद्दल पवारांनी नेमके कुठले किस्से सांगितले आहेत, याबद्दलही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’ च्या सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन झाले. या पुरस्कार सोहळ्यासाठी शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार, मुलगी सुप्रिया सुळे, त्यासोबतच माध्यमातील अनेक दिग्गज मंडळी यावेळी उपस्थित होते.
प्रकाशन सोहळ्याला राष्ट्रवादीचे प्रमुख नेतेदेखील या कार्यक्रमाला हजर होते. यशवंतराव चव्हाण सेंटर सभागृहात सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनचा सोहळा पार पडला. “लोक माझे सांगाती” पुस्तकातील नव्या आवृत्तीत 75 पानं वाढवण्यात आली आहेत.
शरद पवारांच्या 2015 ते डिसेंबर 2022 पर्यंतच्या राजकीय घडामोडींच्या प्रवासाबद्दल भाष्य केले आहे. या पुस्तकात २०१९ मध्ये अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापण्यासाठी केलेला पहाटेचा शपथविधी. त्यानंतर महाविकास आघाडीची स्थापना आणि सरकारमधील कारभार यांवरही या पुस्तकातून भाष्य करण्यात आलं आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी परिस्थिती कशी हाताळली याबाबत या पुस्तकात भाष्य करण्यात आलं आहे.