राजगुरूनगर – पुणे जिल्ह्यात अग्रणी असलेल्या राजगुरूनगर सहकारी बॅंकेचे 2023 च्या दिनदर्शिकेचे बॅंकेचे अध्यक्ष ऍड. राहुल तांबे पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
यावेळी बॅंकेचे संचालक राजेंद्र वाळुंज, विजया शिंदे, विजय डोळस, दिनेश ओसवाल, रामदास धनवटे, विनायक घुमटकर, समीर आहेर, महेश शेवकरी, मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वाकचौरे, संजय ससाणे, अमृत टाकळकर, सम्राट सुपेकर, बाळासाहेब घोलप, मनजीत महेंद्रकर, दिलीप मलघे, सभासद प्रतिनिधी बॅंकेचे ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्राहक, सभासद यांना मार्गदर्शक व उपयुक्त असलेली बॅंकेची 2023 ची दिनदर्शिका सभासदांनी बॅंकेच्या शाखांमधून घेऊन जावी, असे आवाहन अध्यक्ष ऍड. राहुल तांबे पाटील यांनी केले.