राजगुरूनगर – राजगुरूनगर सहकारी बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी बॅंकेचे ज्येष्ठ संचालक, माजी अध्यक्ष किरण मांजरे यांची निवड करण्यात आली. तसेच बॅंकेचे संचालक दिनेश ओसवाल, किरण आहेर यांसह सभासद प्रतिनिधी संचालक म्हणून माजी अध्यक्ष दीपक वारूळे, भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष ऍड. सुरेश कौदरे, उद्योजक महेश शेवकरी व डॉ प्रशांत गदिया यांची निवड करण्यात आली आहे.
भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार राजगुरूनगर सहकारी बॅंकेच्या 2022-2027 या कालावधीकरीता व्यवस्थापन मंडळाची निवड करण्यात आली आहे. त्यात बॅंकेच्या संचालकांपैकी तीन सदस्य व त्या व्यतिरिक्त सभासद प्रतिनिधी म्हणून चार सदस्य असे सात सदस्यांचे व्यवस्थापन मंडळ निवडण्यात आले आहे.
व्यवस्थापन मंडळ पदाधिकारी यांचा निवडीबद्दल बॅंकेच्या सभागृहामधे अध्यक्ष राहुल तांबे पाटील, उपाध्यक्ष दत्ता भेगडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालक विनायक घुमटकर, विजय डोळस, रामदास धनवटे, विजया शिंदे, समीर आहेर, अरुण थिगळे, अश्विनी पाचारणे, गणेश थिगळे, सागर पाटोळे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वाकचौरे, उपसरव्यवस्थापक अमृत टाकळकर, संजय ससाणे, सह सरव्यवस्थापक बाळासाहेब घोलप उपस्थित होते.