नगर (प्रतिनिधी) – मनोरुग्णांची व मतिमंदांची सेवा करण्याचे काम खूप मोठे आहे. ते काम म्हणजे ईश्वरसेवेसारखे आहे. मनोरुग्णांना आधाराची खरी गरज असते. त्यांना आधार देण्याचे काम माऊली सेवा प्रतिष्ठान करत आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
आ. जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त माऊली सेवा प्रतिष्ठानला 21 हजारांचा धनादेश अहमदनगर जिल्हा कामगार संघटना व अफजल शेख यांनी दिला. यावेळी मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, जिल्हा कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे, अफजल शेख, सतीश बारस्कर, डॉ. सागर बोरुडे आदी उपस्थित होते.
यावेळी संतोष लांडे म्हणाले की, मनोरुग्णांना आधार देण्याचे काम माऊली सेवा प्रतिष्ठानतर्फे सातत्याने करत आहे. त्यांचे हे काम कौतुकास्पद आहे. यासाठी त्यांना जेवढी मदत होईल तितके कमीच आहे.