नगर (प्रतिनिधी) – हातावर पोट असलेल्या गटई कामगारांचे करोनापासून संरक्षण होण्यासाठी चर्मकार विकास संघाच्या वतीने शहरातील चर्मकार बांधवाना सॅनिटायझर, मास्क व होमिओपॅथीचे आर्सेनिक अल्बम 30 गोळ्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी युवा जिल्हाध्यक्ष निलेश आंबेडकर, पांडूरंग काजळकर, बाबासाहेब आंबेडकर, भारत बोबडे, संतोष कांबळे, गणेश रासे, गोपीनाथ म्हस्के, ज्ञानेश्वर देव्हारे, भिकाजी वाघ, विष्णू जळजळकर, भानुदास नन्नवरे, एकनाथ दुसुंगे आदी उपस्थित होते.
करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्रच लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. शासनाने अंशता: शिथिल केल्याने छोटे-मोठे उद्योग सुरु झाले आहेत. या कामगारांचे करोना पासून बचाव होण्यासाठी चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर व नगरसेवक डॉ.सागर बोरुडे यांनी शहरातील गटई कामगारांची भेट घेऊन त्यांना सॅनिटायझर, मास्कचे वाटप करण्यात आले.