उपसरपंचपदी प्रियंका खाडे : म्हसेमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष
सविंदणे – शिरूर तालुक्यातील म्हसे बुद्रुक गाव स्वतंत्र झाल्यानंतर प्रथम सरपंचपदी 21 वर्षीय तरूण सौरभ पाटील बुवा पवार यांची तर उपसरपंचपदी प्रियंका जालिंदर खाडे यांची निवड झाली आहे.
म्हसे बुद्रुक ग्रामपंचायत स्वतंत्र झाल्यानंतर पहिलीच निवडणूक पार पडली. निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून तरुणांनी आग्रह धरला. परंतु काही मातब्बर राजकारणी लोकांनी सरपंचपदासाठी आग्रह धरल्याने गावावर निवडणूक लादली गेली. ग्रामपंचायत विभाजन करण्यात महत्वाची भूमिका असणारे काळूराम ऊर्फ पाटील बुवा पवार यांचेच नाव मतदार यादीतून वगळले गेले. परंतु तरीही त्यांनी पॅनल टाकला.
त्यांचा मुलगा सौरभ हा निवडणुकीला सामोरा गेला. जनतेनेही त्यांच्याच बाजूने कौल दिला. त्यांच्या पॅनल ला 5-2 असे स्पष्ट बहुमत मिळाल्याने पवार यांना बिनविरोध प्रथम सरपंचपदी निवड केली. बेट भागातील सर्वात तरुण सरपंच म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. यावेळी जालिंदर संता मुसळे, मंगल जयवंत मुसळे, निलेश पोपट नरसाळे, दामिनी हनुमंत मुसळे, मंदा सदाशिव वेताळ उपस्थित होते.
सर्व नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्यांचे माजी सरपंच दामुशेठ घोडे, सरपंच अरुणा घोडे, निवृत्त सीईओ प्रभाकर गावडे, सोसायटीचे अध्यक्ष बन्सी घोडे यांनी अभिनंदन केले.