कोंढवा, दि. 23 (प्रतिनिधी) -छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनुद्गार काढणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचा महाविकास आघाडीच्यावतीने निषेध करण्यात आला. महाविकास आडीच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार महादेव बाबर यांच्या नेतृत्वाखाली कोंढवा बुद्रुक येथील खडी मशीन चौकात “मशाली’ने धोतर जाळून जोरदार घोषणाबाजी करीत तीव्र निषेध आंदोलन केले.
यावेळी माजी नगरसेविका संगीता ठोसर, राष्ट्रवादीचे संदीप बधे, कार्याध्यक्ष डॉ. जगदाळे, शिवसेनेचे गणेश कामठे, उदयसिंह मुळीक, श्याम मरळ, युवा सेनेचे शहर उपाध्यक्ष विकास बधे, अमर कामठे, सचिन कामठे, दत्ता घोडके, आदित्य हगवणे, किरण ठोसर, प्रदीप पवार उपस्थित होते.
घोड्याच्या टाचेखाली प्रतिमा तुडवल्या
हडपसर, दि. 23 (प्रतिनिधी) -छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत बेताल वक्तव्य केल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोशारी व भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या घोड्याच्या टाचेखाली प्रतिमा तूडवून माजी आमदार महादेव बाबर यांनी आंदोलन केले. हडपसर उड्डाणपुलाखाली जिजामाता चौक येथे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कोशारी व त्रिवेदी यांच्या हकालपट्टीची मागणी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, शहर उपाध्यक्ष समीर तुपे, हडपसर विधानसभा अध्यक्ष राजेंद्र बाबर, विद्या होडे, प्रसाद बाबर, संजय सकपाळ, महेंद्र बनकर, अजय सकपाळ, विवेक तुपे, प्रवीण रणदिवे, बाळासाहेब भिसे आदी यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्तेही उपस्थित होते.