बॉलिवूडचा ‘दबंग खान’ म्हणून ओळखला जाणारा सलमान खानचा ‘दबंग ३’ हा सिनेमा २० डिसेंबरला मोठ्या पडद्यावर रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.सिनेमात सलमानसोबत सोनाक्षी सिन्हा, सई मांजरेकर लीड रोलमध्ये तर सुदीप खलनायकाच्या भूमिकेत आहे. या सिनेमाने तीन दिवसात ८१.१५ कोटी रूपयांची कमाई केली आहे. यामध्ये पहिल्या दिवशी २४.५० कोटी आणि दुस-या दिवशी २४.७५ कोटी तर तिस-या दिवशी ३१.९० कोटी रूपयांची कमाई केली.
#Dabangg3 – despite protests affecting its biz severely – packs ₹ 80 cr+ in its *opening weekend*, primarily due to the superstardom of #SalmanKhan… Fri 24.50 cr, Sat 24.75 cr, Sun 31.90 cr. Total: ₹ 81.15 cr. #India biz. Note: All versions.
— taran adarsh (@taran_adarsh) December 23, 2019
दरम्यान, नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी विरोधात सध्या देशातील प्रत्येक शहरात निदर्शने केली जात आहेत. काही ठिकाणी शांततेत, तर काही ठिकाणी हिंसक आंदोलन झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे दबंग-३ या सिनेमाला कमाईमध्ये नुकसान सहन करावे लागलं आहे. याबदल ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट केलं आहे. त्यानुसार या प्रकरणामुळं वींकेडमध्ये सिनेमाच्या कमाईत जवळपास १२ कोटी रूपयांचे नुकसान झालं आहे.
#Dabangg3 partially regains lost ground on Day 3… Biz jumps across circuits… Loses a big chunk of *opening weekend* biz [approx ₹ 12 cr] due to protests… Day 4 [Mon] crucial… #Christmas celebrations [Tue evening onwards and Wed] should boost biz…
— taran adarsh (@taran_adarsh) December 23, 2019
या वर्षीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास ‘दबंग ३’ या वर्षीचा ५ वा ‘सर्वाधिक वीकेंड ओपनर’ सिनेमा ठरला आहे. यामध्ये रूतिक रोशन आणि टाइगार श्राॅफ यांचा ‘वाॅर’ हा सिनेमा क्रमांक १ वर आहे. या सिनेमाची ओपनिंग वीकेंड मध्ये १६६.२५ कोटी रूपयांची कमाई झाली होती. यानंतर एवेंजर्स : एंडगेम (१५७.२ कोटी) , भारत (१५०.१० कोटी) , मिशन मंगल ( ९७.५६ कोटी), दबंग ३(८१.१५ कोटी) यांचा अनुक्रमे दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा क्रंमाक लागतो.