कंगणा रणावत सध्या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या बायोपिकच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. त्याबरोबर कंगणा आपल्या आगामी “पंगा’चे प्रमोशनही करते आहे. या प्रमोशनसाठी कंगणाने चक्क रेल्वे स्टेशन गाठले. रेल्वे स्टेशनच्या तिकीट खिडकीवर बसून ती चक्क तिकीटे विकताना दिसते आहे.
तिला तिकिटे विकताना बघून रेल्वे प्रवासी आश्चर्यचकित झाले आहेत. मात्र हा केवळ पब्लिसिटीसाठीचा प्रमोशन फंडा आहे, हे लवकरच सगळ्यांच्या लक्षात येते. तिने ही आयडिया का लढवली, याचे देखील एक कारण आहे. हे कारण “पंगा’च्या कथानकात आहे. सिनेमात ती कबड्डीची राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू म्हणून दिसणार आहे.
त्याचबरोबर ती रेल्वेतील तिकीट खिडकीवरील कर्मचारी म्हणूनही काम करताना दिसणार आहे. म्हणूनच तिने सिनेमाच्या प्रमोशनसाठी प्रत्यक्षात तिकीट खिडकीवर बसून प्रवाशांना तिकिटे देण्याची आयडिया लढवली. त्यासाठी तिने छत्रपती शिवाजी टर्मिनसवर तिकिटे फाडली.
तिचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होतो आहे. “पंगा’ पुढच्या वर्षी 24 जानेवारीला रिलीज होणार आहे. “पंगा’मध्ये कंगणाबरोबर रिचा चढ्ढा, राजेश तेलंग आणि जस्सी गिल हे लीड रोलमध्ये दिसणार आहेत.