राजगुरूनगर : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरल्या प्रकरणी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लीगल सेल यांच्यावतीने निषेध व्यक्त करत त्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले.
देशाचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अपशब्द वापरल्याचा खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लिगल सेल यांच्या वतीने यांचा निषेध करण्यात आला . निषेधाचे निवेदन नायब तहसीलदार मालती धोत्रे यांना देण्यात आले. खेड न्यायालयाच्या बाहेरील आवारात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले.
यावेळी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लिगल सेलचे अध्यक्ष ॲड.अरुण मुळूक, जेष्ठ विधिज्ञ ॲड.बी एम सांडभोर, ॲड.सुखदेव पानसरे, खेड वकील बार असोशिएशनचे अध्यक्ष ॲड.संजय पानमंद, उपाध्यक्ष ॲड. अतुल गोरडे, माजी अध्यक्ष ॲड. सुभाष कड, ॲड.माणिक पाटोळे, ॲड. संदीप गाडे, ॲड. बाळासाहेब निघोट, ॲड. अतिक सय्यद, ॲड. संदीप टेमगिरे, ॲड. सोमनाथ थोरवे, ॲड. रमेश गोकुळे, ॲड. सचिन पवळे, ॲड. दीपक पवळे, कालिदास दौंडकर, माउली करंडे, शिवाजी वाळूज, गौतम लोखंडे, पांडुरंग खुटाळ आदी उपस्थित होते.
यावेळी लीगल सेलचे अध्यक्ष अरुण मूळूक, जेष्ठ विधितज्ञ बी एम सांडभोर, माणिक पाटोळे यांनी निषेध सभेत भाषण केले.