नवी दिल्ली – देशातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याने आज सीबीएसई व आयसीएसई बोर्डाने दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. यापूर्वी बोर्डाने या परीक्षा १ ते १५ जुलै दरम्यान घेण्याचे योजले होते. मात्र आता या परीक्षा रद्द करत असल्याच केंद्राचे सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले.
यंदा देशावर कोरोनाचे संकट ओढावल्यानेशैक्षणिक क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक राज्यांना विद्यापीठाच्या परीक्षा देखील रद्द कराव्या लागल्या असून शैक्षणिक वर्षाची सुरुवातही लांबणीवर टाकावी लागली आहे.
CBSE decides to cancel 10th and 12th exams scheduled for July 1 to 15, Solicitor General Tushar Mehta informs Supreme Court. #COVID19 pic.twitter.com/5XjLQWtJpV
— ANI (@ANI) June 25, 2020
अशातच आता कोरोना प्रादुर्भावामुळे सीबीएसई व आयसीएसई बोर्डांना देखील परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. आयसीएसई बोर्डाने परीक्षा पूर्णपणे रद्द केली असून विद्यार्थ्यांना या परीक्षा परत देण्याची मुभा दिलेली नाही. सर्वोच्च न्यायालयात याबाबतची माहिती देताना सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी, बोर्डानं दिलेल्या गुणांवर समाधान न झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यास बोर्डानं नकार दिला असल्याचे सांगितले.
ICSE board also to cancel class 10 and 12 board exams. However, ICSE doesn’t agree to give option to students to write exam later, Solicitor General Tushar Mehta informs Supreme Court. #COVID19 pic.twitter.com/jKTKWbSkj7
— ANI (@ANI) June 25, 2020