भोपाळ – मध्यप्रदेशातील सिहोरमध्ये पोलिसांनी एक मोठे सेक्स रॅकेट उघड केले आहे. शहरातील बसस्थानकाजवळील एका घरात अनेक दिवसांपासून सेक्स रॅकेट सुरू होते. या ठिकाणी कारवाई करत पोलिसांनी 4 मुली, 3 ग्राहक, एक चालक, एक संचालिका आणि एक महिला व्यवस्थापक अशा 10 जणांना अटक केली आहे.
– भोपाळहून आल्या होत्या मुली
पोलिसांना सेक्स रॅकेटची माहिती मिळाली होती, त्यावरून पोलिसांनी रात्री उशिरा छापा टाकला. यावेळी चार मुली मुलांसोबत अक्षेपार्ह अवस्थेत आढळून आल्या. पोलिसांनी सर्वांना अटक केली आहे. तपासात या मुली भोपाळ येथून येत असल्याची माहिती समोर आली आहे.
ज्या महिलेल्या घरी सेक्स रॅकेट पकडले त्या महिलेचे नाव अनुपमा असून ती स्वत:ला समाजसेविका म्हणवून घेत होती. अनेक व्हीआयपींसोबतचे फोटो ती फेसबुकवर शेअर करीत असे. एकदा तिने एका पक्षाकडून महापालिका निवडणूकही लढवली होती, ज्यात तीचा दारुण पराभव झाला होता. सध्या पोलीस कसून चौकशी करत असून यामध्ये मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
याप्रकरणी एएसपी समीर यादव म्हणाले की, पोलिसांना सेक्स रॅकेटची माहिती मिळाली, त्यानुसार कारवाई केली आहे. यामध्ये 10 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच 28 हजार 710 रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्वांची चौकशी सुरू आहे. सर्व मुली भोपाळहून आल्या होत्या.