कर्नाटक – विधानसभेच्या निवडणुकांचा आज निकाल जाहीर होणार आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र दिसत आहे. बहुतमाचा आकडा पार करुन काँग्रेस 117 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप 76 जागांवर आघाडीवर आहे. काही ठिकाणी मात्र, भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये ‘काँटे की टक्कर’ असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे बेळगावमध्येही काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत.
सुरुवातीचे जवळपास 200 हून अधिक जागांचे कल हाती आले आहेत. यामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. विशेष म्हणजे बेळगावमधील 18 जागांपैकी 14 जागांवर काँग्रेसने आघाडी घेतली आहे. तर भाजप चार जागांवर आघाडीवर आहे. यावरून कर्नाटकात कॉँग्रेस मुसंडी मारत असल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी यांनी शिमल्यातील प्रसिद्ध जाखू मंदिरात हनुमानाच्या दर्शनाचे दर्शन घेतले आहे.
प्रियंका गांधी गुरुवारी शिमला येथे छाबरा या खाजगी निवासस्थानी आल्या आहेत. त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी त्यांच्या आई आणि काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधीही शिमल्याला पोहोचल्या. त्यानंतर आज त्यांनी कर्नाटक निकालाच्या मतमोजणी दरम्यान हनुमानाचे दर्शन घेतले. सध्या प्रियांका गांधी यांचे मंदिरातील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
#WATCH | Congress General Secretary Priyanka Gandhi Vadra offers prayers at Shimla’s Jakhu temple pic.twitter.com/PRH47u36Zm
— ANI (@ANI) May 13, 2023
विशेष म्हणजे कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भगवान हनुमानाचा मुद्दा प्रचंड गजला होता. काँग्रसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदी घाला, असे म्हंटले होते. याच मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकच्या जनतेने त्यांना धडा शिकवण्यासाठी मतदानयंत्रावर बटण दाबताना ‘जय बजरंगबली’ असा उच्चार करा, असे आवाहन केले होते. यावरून विरोधी पक्षांकडून मोदींवर टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता बजरंग दल विरुद्ध बजरंगबली या लढतीत भारतीय जनता पक्षाच्या आरोपाला या प्रियांका गांधी यांच्या फोटोच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.