मुंबई – अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या ‘सिटाडेल’ या सीरिजला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. 28 एप्रिलला रिलीज झालेल्या या सीरिजने नवा रेकॉर्ड केला आहे. ‘सिटाडेल’ने जगभरातील लोकप्रिय वेबसीरिजच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. अल्पावधीतच या सीरिजने मोठे यश मिळवले आहे.
प्रियांकाच्या ‘सिटाडेल’ या वेबसिरिजला 1125 रेटिंग मिळाले आहेत. या सीरिजमध्ये प्रियांकसोबत अभिनेता रिचर्ड मॅडनने काम केले आहे. तर वेल आणि रुसो ब्रदर्सने या सीरिजची निर्मिती केली. या वेबसीरिजमधील प्रियांकाचा अॅक्शन मोड प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. ‘सिटाडेल’ नंतर दुसऱ्या स्थानावर नेटफ्लिक्सची ‘स्वीट टूथ’ ही सीरिज आहे. या वेबसीरिजला 669 रेटिंग मिळाले आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर ‘The Marvelous Mrs Maisel’ असून याला 623 रेटिंग मिळाले आहे. चौथ्या क्रमांकावर ‘The Diplomat’ (572 रेटिंग) आहे. तर पाचव्या क्रमांकावर ‘पावर’ (533 रेटिंग) आहे.
दरम्यान, ‘सिटाडेल’ ही सीरिज प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. यातील कलाकारांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले आहे. सिटाडेल ही एक स्पाय स्टोरी आहे ज्यामध्ये प्रियांका स्वतः एक गुप्तहेर आहे. त्याच्यासोबत रिचर्ड मॅडन मुख्य भूमिकेत आहे. स्टॅनली टुसी आणि लेस्ली मॅनव्हिल देखील यात आहेत. सिटाडेल ही प्रियांकाची दुसरी हॉलिवूड सीरिज आहे, ज्यात ती एका गुप्तहेराची भूमिका करताना दिसत आहे. याआधी प्रियांकाने ‘क्वांटिको’मध्ये अशीच भूमिका साकारली आहे.