छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर घराघरात पोहचली. उत्तम आणि अचूक विनोदी शैलीने तिने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. तिच्या मोहक अंदाजाने तिने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तसेच सोशल मीडियावर प्रियदर्शनी वक्तव्यामुळे देखील ती चर्चेत राहिली आहे. अनेकदा तिला आयुष्यामुळे ती चर्चेत आली आहे. अशातच प्रियदर्शनीला तिच्या आयुष्यातला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळालाय. यानिमित्त पोस्ट करुन तिने तिचा आनंद व्यक्त केलाय.
View this post on Instagram
प्रियदर्शनीने फोटो पोस्ट करुन लिहिलंय की, ‘खुप सुंदर असलेली फिल्मफेअरची एक रात्र. सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीसाठी मला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. मला अजुनही विश्वास बसत नाहीय. माझ्या या प्रवासात जे कोणी सोबत होते त्या सर्वांना धन्यवाद. माझे मित्र, कुटुंब, खास मित्र, सहकारी, निर्माते, मार्गदर्शक आणि सर्वांना धन्यवाद. अशीच नवनवीन निर्मिती करुया. एकमेकांना प्रोत्साहन देत जादू घडवूया’
फुलराणी’ या मराठी सिनेमासाठी प्रियदर्शनीला बेस्ट डेब्यू अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. ‘फुलराणी’ सिनेमात प्रियदर्शनीसोबत अभिनेता सुबोध भावेची प्रमुख भूमिका होती. या सिनेमातले संवाद, प्रियदर्शनीचा अभिनय याची बरीच चर्चा झाली. प्रियदर्शनीची प्रमुख भूमिका म्हणून हा सिनेमा गाजला. बॉक्स ऑफीसवर सिनेमाने संमिश्र कामगिरी केली. तुम्ही हा सिनेमा प्राईम व्हिडीओवर बघू शकता. दरम्यान या सिनेमासाठी फिल्मफेअर मिळाल्याबद्दल अनेकांनी प्रियदर्शनीचं अभिनंदन केलंय.