वानरवाडी पाझर तलावामुळे परिसराचे सोने होईल : आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड – वानरवाडी पाझर तलाव दुरुस्तीसाठी मी मुख्यमंत्री असताना 4 कोटी 18 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली होती. सरकार बदलल्यानंतर सर्व कामांना स्थगिती दिली. परंतु सातत्याने पाठपुरावा करुन सदरचे काम मंजूर करून घेतले. तलावाच्या नुतनीकरनाद्वारे या परिसराचे खऱ्या अर्थाने सोने होईल, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

वानरवाडी, ता. कराड येथील जुन्या पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी आ. चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून तब्बल 6 कोटी 85 लाख 19 हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. आनंदराव पाटील, कराड दक्षिण कॉंग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, शंकरराव खबाले, नंदाताई यादव, उत्तमराव पाटील, नामदेव पाटील, सुनील पाटील, इंद्रजीत चव्हाण, हेमंत जाधव, ऍड. नरेंद्र नांगरे-पाटील, शिवाजीराव मोहिते तसेच मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

आ. आनंदराव पाटील म्हणाले, कॉंग्रेसशी ज्यांचा काडीमात्र संबंध नाही, अशा व्यक्तींचा प्रवेश भासवून प्रसिध्दी मिळवणे म्हणजेच विरोधकांनी खोटा टीआरपी वाढवण्याचा उद्योग सुरू केला आहे. हे उद्योग यापुढेही सुरू राहतील, परंतु पृथ्वीराजबाबाच यापुढे कराड दक्षिणचे आमदार राहणार आहेत. त्यांची बरोबरी कोणीही करू शकत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.