पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

अमित शाह यांनी सुद्धा आपली पत्नी सोनल शाह यांच्या बरोबर केलं मतदान

गुजरात – लोकसभा निवडणूक 2019 च्या महासंग्रमातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. राज्यातील 14 मतदारसंघांसह देशातल्या एकूण 117 जागांवर निवडणूक लढवणाऱ्या दिग्गाजांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला आहे.

आज सकाळी अहमदाबादमधील रानिप येथील मतदान केंद्रावर पंतप्रधान मोदींनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी मोदींची एक झलक पाहण्यासाठी  स्थानिकांनी प्रचंड गर्दी केली होती. तर, दुसरी कडे भाजप पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी सुद्धा आपली पत्नी सोनल शाह यांच्या बरोबर अहमदाबाद येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले आहे.

PM Narendra Modi casts his vote at a polling booth in Ranip,Ahmedabad #Gujarat #LokSabhaElections2019 pic.twitter.com/qOfJW7uRZC

दरम्यान, पत्रकारांशी संवाद साधतांना मोदी म्हणाले की, ‘देशात तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. माझे भाग्य आहे की मला आज माझे कर्तव्य निभावण्याची सौभाग्य प्राप्त झाले. मी माझ्या मतदारसंघात मतदान करून या लोकशाहीच्या पर्वात सहभाग घेतला आहे. सर्वांनी मतदान करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केलं. 21 व्या शतकात जन्मलेल्या आणि पहिल्यांदाच लोकसभेला मतदान करणाऱ्या सर्व युवा मतदारांना शुभेच्छा देतो.’
her Secondary School in Ranip, Ahmedabad; BJP President Amit Shah also present pic.twitter.com/wu3Y5EopRF

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.