नवी दिल्ली – मागील काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये काँग्रेसची स्थिती दयणीय झाली आहे. अनेक ठिकाणी सत्ता असूनही काँग्रेसला अडचणींचा सामना करावा लागत आहेत. कधी कोणता नेता पक्ष सोडून भाजपमध्ये सामील होईल, याचाही भरवसा राहिला नाही. मात्र अशी स्थिती असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या एका मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक केलं आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे माझे चांगले मित्र आहेत, असं विधान गुरुवारी पतंप्रधान मोदींनी केलं. राजस्थानमधील 4 वैद्यकीय महाविद्यालयांच्या पायाभरणीच्या व्हर्च्युअल समारंभात मोदी बोलत होते.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे आभार मानत मोदींनी त्यांचं कौतुक केलं. “मुख्यमंत्री गेहलोत यांनी राज्यासाठीच्या विकासकामांची यादी माझ्यासमोर ठेवली. वेगवेगळ्या राजकीय विचारधारा असूनही त्यांचा माझ्यावर विश्वास असल्याचं यातून दिसून येतं. मी गेहलोत यांचे आभार मानतो, असंही मोदींनी म्हटलं.
तसेचं मोदींचा माझ्यावर विश्वास आहे. ही मैत्री आणि विश्वासच हा लोकशाहीचा सर्वात मोठा विजय आहे, असंही मोदींनी नमूद केलं.