युरोपियन परिषदेमध्ये पंतप्रधान सहभागी

नवी दिल्ली – युरोपिय कौन्सिलच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्‍य माध्यमातून सहभागी झाले. 

युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मायकेल यांच्या विशेष निमंत्रणावरून 27 सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या या बैठकीमध्ये पंतप्रधान सहभागी झाले. दीर्घकाळापासून रखडलेले भारत-युरोपिय संघादरम्यानची व्यापारी चर्चा पुन्हा सुरू करण्याबाबत आजच्या बैठकीमध्ये निश्‍चिती झाली. 

भारत आणि युरोपिय संघादरम्यानची संरक्षण भागीदारी 21 व्या शतकामध्ये जगाच्या कल्याणासाठी असल्याचे सिद्ध होईल, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे पश्‍चिम क्षेत्राचे सचिव विकास स्वरुप यांनी ट्विटमध्ये सांगितले. 

करोनाच्या साथीमुळे या बैठकीला पंतप्रधान समक्ष उपस्थित राहू शकले नाहीत आणि त्यांना दूरदृश्‍य माध्यमातून या बैठकीत सहभागी व्हावे लागले आहे. ही बैठक पोर्तुगालमध्ये झाली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.