महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे अनेक चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग गोवा किंवा अन्य राज्यांमध्ये हलविण्यात आले आहे. सैफ अली खान, प्रभास आणि क्रिती सेननच्या “आदिपुरुष’चे उरलेले शूटिंगदेखील महाराष्ट्राबाहेर करण्याचे ठरले आहे.
आता हे शूटिंग हैदराबादमध्ये खास तयार केलेल्या इन डोअर सेटमध्ये पूर्ण केले जाणार आहे. “आदिपुरुष’ची सगळी टीम लवकरच मुंबईवरून हैदराबादला रवाना होणार आहे. या सर्व टीमची करोना चाचणीदेखील केली जाणार आहे. आतापर्यंत 60 दिवसांचे शूटिंग महाराष्ट्रात पूर्ण झाले आहे. उर्वरित 90 दिवसांचे शूटिंग हैदराबादला होणार आहे. “आदिपुरुष’मध्ये प्रभास भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार आहे.
यावर्षी फेब्रुवारीमध्ये शूटिंग सुरू झाले तेव्हा प्रभास क्रिती सेनन आणि सनी सिंह यांनी सोशल मीडियावर अपडेट दिला होता. कदाचित हैदराबादमध्ये शूटिंग सुरू केल्यावर पुन्हा तसाच अपडेट दिला जाईल.