झेंडूची उच्चांकी झेप…

फुल विभागात तब्बल 5 कोटी 71 लाख 83 हजार 700 रुपयांची उलाढाल

पुणे – करोना काळात आवक आणि मागणी कमी असतानाही भाव वाढल्याने मार्केट यार्डातील फुल विभागात झेंडूची उलाढाल गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त झाली. यावर्षी तब्बल 5 कोटी 71 लाख 83 हजार 700 रुपयांची उलाढाल झाली.

जी गेल्यावर्षीच्या तुलनेत 1 कोटी 94 लाख 76 हजार 190 रुपयांनी जास्त आहे. फुल बाजारात एकूण 12 कोटी 71 लाख 48 हजार 25 रुपयांची उलाढाल झाली. त्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत 67 लाख 68 हजार 419 रुपयांची वाढ झाली.

विशेषत: विजयादशमीच्या काळात फुलांची चांगली उलाढाल झाली. यंदा करोना, अधिक महिना, पाऊस यामुळे फुल उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, दसऱ्याला फुलांना मागणी आणि भाव चांगले मिळाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

नवरात्रोत्सवाच्या दहा दिवसांत विविध प्रकारच्या 8 हजार 933.98 क्विंटल इतकी फुलांची विक्री झाली. पुणे जिल्ह्यासह सातारा, नगर, सोलापूर, जालना, हिंगोली आदी परिसरातून फुलांची आवक झाली, अशी माहिती फुलबाजार विभागाचे प्रमुख प्रदीप काळे यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.