पुणे – थंडीमुळे फुलांचे उत्पादन आणि आवक घटली आहे. येत्या मंगळवारी (दि.29) दत्त जयंती आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी मागणी वाढण्याची शक्यता असतानाही अपेक्षित प्रतिसाद नव्हता.
सोमवारी मागणीमध्ये वाढ होण्याची शक्यता असून, भावामध्ये काही प्रमाणात वाढ होईल, असा अंदाज व्यापारी सागर भोसले यांनी वर्तविला आहे.
सर्व प्रकारच्या फुलांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत टिकून आहेत. लग्नसराई आणि दत्त जयंती यामुळे शोभिवंत फुलांना मागणी जास्त आहे. झेंडूलाही नेहमीच्या तुलनेत अधिक मागणी आहे.
फुलांचे प्रतिकिलोचे भाव
झेंडू : 20-30, गुलछडी : 150-200, ऑस्टर : जुडी 10-16, कापरी : 30-50, शेवंती : 100-150, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : 30-50, गुलछडी काडी : 30-80, डच गुलाब (20 नग) : 100-200, जर्बेरा : 40-70, कार्नेशियन : 120-200, शेवंती 100-150.