पुणे – दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचा फटका शेवंतीसह अन्य फुलांना बसला आहे. मार्केटयार्डातील फुलबाजारात सर्व प्रकारच्या फुलांची साधारण आवक होत आहे.
बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत फुलांना मागणी घटली आहे. पावसामुळे दर्जा घसरल्याने बहुतांश फुलांच्या भावात तीस ते चाळीस टक्क्यांनी घसरण झाली आहे.
येत्या गुरुवारी (दि. 14) मकरसंक्रांत आहे. याकाळात फुलांना मागणी वाढून दरही वाढतील, अशी अपेक्षा शेतकरी वर्गाला आहे.
फुलांचे प्रतिकिलोचे भाव
झेंडू : 10-30, गुलछडी : 50-80, अष्टर : जुडी 10-12, सुट्टा 30-60, कापरी : 20-30, शेवंती : 50-80, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : 30-50, गुलछडी काडी : 20-80, डच गुलाब (20 नग) : 80-150, जर्बेरा : 30-50, कार्नेशियन : 80- 120, शेवंती काडी 150-250, लिलियम (10 काड्या)- 800-1300, ऑर्चिड 150-350, ग्लॅडिओ (10 काड्या) : 30-60.