प्रकाशझोतात होणार प्रीमियर क्रिकेट स्पर्धा

पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना क्‍लब आयोजित सातव्या पीवायसी-पुसाळकर सुरक्षा कंपोनंट्‌स प्रीमियर लीग क्रिकेट
स्पर्धेला येत्या रविवारपासून प्रारंभ होत आहे. सामने सायंकाळी 4.30 ते रात्री 10.30 या वेळेत होणार असून काही सामने प्रकाशझोतात होणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना 16 नोव्हेंबरला होणार आहे.

स्पर्धेचे हे सातवे वर्ष आहे. या स्पर्धेत 15 संघ सहभागी होत आहेत. स्पर्धेत प्रत्येक संघात एकूण 9 खेळाडूंचा समावेश असणार आहे. स्पर्धेचे सामने हे 6-6 षटकांचे होणार आहेत. स्पर्धेसाठी क्रिकेट टेनिस बॉलचे सर्व नियम लागू आहेत.

स्पर्धेत बुल्स, चिताज्‌, कोब्राज्‌, डॉल्फिन्स, हॉग्स्‌, जॅगवॉर्स, लायन्स, एनएच वुल्वस, पॅंथर्स, रायनोज, स्कॅवेंजर्स, स्कायलार्कस, टायगर्स, टस्कर्स, विअर वुल्वस्‌ हे 15 संघ भाग घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

स्पर्धेतील 15 संघांची 3 गटांत विभागणी करण्यात आली असून यामध्ये प्रत्येक 5 आणि 6 संघांचा समावेश असणार आहे. तसेच, या तीनही गटांतील अव्वल संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणार असून आणखी दोन संघ सरासरी आणि नेटरनरेटच्या आधारावर पात्र ठरणार आहेत. विजेत्या संघाला ज्ञानेश्वर आगाशे स्मृती करंडक देण्यात येणार असून याशिवाय वैयक्तिक पारितोषिकेही दिली जाणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.