Splash Pad Shooting : मिशीगनमधील स्वैर गोळीबारात 9 जखमी, 2 लहान मुलांचाही समावेश…

रॉकस्टर हिल्स (अमेरिका) :- अमेरिकेतल्या मिशीगन प्रांतातल्या डेट्रॉएट उपनगरामध्ये एका व्यक्तीने केलेल्या स्वैर गोळीबारामध्ये किमान ९ जण जखमी झाले आहेत. यामध्ये एक महिला आणि तिच्या दोन लहान मुलांचाही समावेश आहे.
शनिवारी उन्हाळ्याने हैराण झालेले हे सर्वजण जलक्रीडा उद्यानात विरंगुळ्यासाठी आले होते. संशयित हल्लेखोराला पोलिसांनी शोधून काढले. मात्र पोलिसांच्या हाती लागण्याआगोदरच हल्लेखोराने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.
या स्वैर गोळीबारामध्ये ८ वर्षांचा एक मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्यात गोळी लागली आहे. या मुलाची आई आणि धाकटा भाऊ देखील गोळीबारात जखमी झाले आहेत, असे ऑकलंड कौंटीचे शेरीफ माईक बौचर्ड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
Pakistan : तेहरिक- ए-तालिबान दहशतवादी संघटनेचा वरिष्ठ कमांडर चकमकीमध्ये ठार…
या शिवाय अन्य ६ जण देखील या गोळीबारात जखमी झाले असून ते सर्व ३० किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे आहेत. हल्लेखोराने जलक्रीडा उद्यानात येऊन बंदुकीच्या जवळपास २५ फैरी झाडल्या. त्याच्या जवळ दोन हॅन्डगन होत्या, असे एका साक्षीदाराने सांगितले.





