चंदीगड- अनेकजण ज्या वयात शिक्षणाच्या गोतावळात व्यग्र असतात. त्याच वयात शिक्षणासोबत अनेक सामाजिक कामे करण्याची ऋची निर्माण झाली. विद्यालयीन शिक्षणाबरोबरच तिने राजकारणात रस दाखवला आणि मिळालेल्या संधीचं सोनं केलं. वयाच्या 21 व्या वर्षी संरपंच बनली. गावात अनेक उपाययोजना राबवल्या, विविध बदल केले आणि तिच्या या कामाची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दखल घेतली.
प्रवीण कौर ही तरुणी अवघ्या २५ वर्षांची आहे. मात्र ती हरयाणामधील गुहला येथील ककराला गावाची सरपंच आहे. इंजिनीयरिंगचे शिक्षण पूर्ण झालेली प्रवीण 1200 लोकसंख्या ककराला गावाची सरपंच झाली.विशेष म्हणजे प्रवीणने सरपंच व्हावे अशी इच्छा गावकऱ्यांनीच व्यक्त केली होती. त्यामुळेच तीने खासगी नोकरी सोडून वयाच्या 21 व्या वर्षी सरपंच पदाची निवडणूक लढवली आणि ती जिंकलीही. या विजयाबरोबरच तीने गावची सर्वात तरुण सरपंच होण्याचा मान पटकावला.प्रवीणच्या आधुनिक पद्धतीने विचार करण्याच्या पद्धतीनेमुळे आणि स्मार्टनेसमुळे अल्पवधीमध्ये तीने गावातील बरीच काम केली आहेत.
2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रवीणच्या कामाचे कौतुक केलं होतं. आपल्या गावामध्ये कोणीही उघड्यावर शौचास जाणार नाही यासाठी शौचालये बांधण्यापासून ते त्यासंदर्भात जनजागृती करण्यासंदर्भातील काम तिने केलं.