तेल अविब : इस्त्राईलमधील आघाडीची मॉडेल असणाऱ्या बार रेफेली हिला इस्त्रायली न्यायालयाने कर चोरीबद्दल अनोखी सजा सुनावली आहे. न्यायालयाने तिला तब्बल नऊ महिने समाजसेवा करण्याचा आदेश दिला आहे. अर्थात या खटल्यामध्ये रेफेलीची आई हिला 16 महिन्यांचा कारावास सुनावण्यात आला आहे.
35 वर्षीय रेफेली आणी तिची आई यांच्या वर इस्त्रायल पोलिसांनी तब्बल 1 कोटी डॉलरच्या करचुकवेगिरीचा आरोप ठेवला होता. या खटल्याची सुनावणी दीर्घ काळ सुरू होती. जुलै महिन्यामध्ये रेफेली आणि तिच्या आईला दोषी ठरविण्यात होतं आलं होतं, त्यानंतर दोन दिवसांपूर्वी न्यायालयाने या दोघींना शिक्षा ठोठावली.
न्यायालयाने रेफिलेची आई जीपी हिला सहा महिन्यांचा कारावास सुनावला तर रेफिलेला नऊ महिन्यांसाठी सामुदायिक समाजसेवा करावी लागणार आहे .अर्थात या खटल्यामध्ये न्यायालयाने रेफेली ला पंधरा लाख डॉलरचा दंडही ठोठावला आहे. या शिक्षेमुळे रेफेलीच्या प्रतिमेला मोठा धक्का पोहोचला आहे, कारण ती अनेक गोष्टींमध्ये इस्त्रायलची राजदूत मानली जाते. टीव्हीवरील अनेक जाहिरातींमध्ये तिचा मॉडेल म्हणून चेहरा लोकप्रिय झाला आहे.
आपण इस्त्रायलमध्ये न राहता दीर्घकाळ परदेशात राहत असल्याने आपल्याला करांमधून माफी मिळावी, असा बचाव तिने घेतला होता. पण न्यायालयाने तो बचाव मान्य न करता तिच्यावर कर चोरीचा आरोप सिद्ध झाले असे सांगितले. रॅलीला सामुदायिक समाजसेवा कोणत्या प्रकारची करावी लागणार आहे, याचा तपशील लवकरच जाहीर केला जाणार आहे.
हॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रियो बरोबर राफेलीचे प्रेम प्रकरण गाजले असल्याने ती मध्यंतरी चर्चेत आली होती. आता करचुकवेगिरीचा प्रकरणातून इस्त्राईल मधील माध्यमांमध्ये पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. ती आपली शिक्षा कशी भोगते, याविषयी देशात उत्सुकता आहे.