चंदीगड – पंजाब आणि हरियाणामध्ये दाट धुक्यासह कडाक्याची थंडी कायम आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, भटिंडा हे पंजाबमधील सर्वात थंड ठिकाण होते, जेथे किमान तापमान एक अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा तीन अंशांनी कमी आहे.
हरियाणाच्या हिसारमध्ये किमान तापमान सामान्यपेक्षा पाच अंशांनी कमी म्हणजेच दोन अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पंजाब आणि हरियाणाची संयुक्त राजधानी असलेल्या चंदीगडमध्ये किमान तापमान 5.1 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
पंजाबमधील अमृतसर आणि लुधियाना येथे किमान तापमान 4.2 आणि 7.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा दोन अंशांनी जास्त आहे. पतियाळा, पठाणकोट, हलवारा, फरीदकोट आणि गुरुदासपूर येथे अनुक्रमे 4.7, 4.2, 2.7, 4.5 आणि 5.1 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले आहे. पंजाबमधील भटिंडा, पटियाला आणि हरियाणातील अंबाला शहर दाट धुक्याने वेढले आहे.