Pravin Tarade On Swatantryaveer Savarkar Movie : बॉलिवूड अभिनेता रणदीप हुडा ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. हा चित्रपट 22 मार्चला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात रणदीपसोबत अंकिता लोखंडे आणि अमित सियाल हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. वीर सावरकरांचा संपूर्ण प्रवास या चित्रपटातून उलगडण्यात आला आहे. मराठमोळा अभिनेता,दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी देखील या चित्रपटातबाबत एक खास पोस्ट शेअर केली आहे. | Pravin Tarade On Swatantryaveer Savarkar Movie
विनायक दामोदर सावरकर यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज, आनंद पंडित, संदीप सिंग, रणदीप हुड्डा आणि योगेश राहर यांनी केली आहे. | Pravin Tarade On Swatantryaveer Savarkar Movie
अनेक कलाकारांनी या चित्रपटात रणदीप हुडाने केलेल्या कामाचे कौतुक केले आहे. प्रवीण तरडे यांनी देखील आपल्या सोशल मीडियावरून याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये तरडे म्हणतात,”धर्मो रक्षति रक्षित:॥अफाट अचाट आयुष्य जगलेल्या.. जातीपातीला गाडण्यासाठी झटलेल्या.. .. महान व्यक्तीमत्वाची प्रेरणादायी गोष्टं.. ताबडतोब बघावा असा तडाखेबंद सिनेमा”
रणदीप हुडाने केलं वजन कमी
या चित्रपटात विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारण्यासाठी रणदीपने स्वत:ला त्या व्यक्तिरेखेत पूर्णपणे सामावून घेण्यासाठी 26 किलो वजन कमी केले. त्याने कमी वजनातील फोटोही सोशल मीडियावर अनेकदा शेअर केले होते, जे व्हायरल झाले होते. | Pravin Tarade On Swatantryaveer Savarkar Movie