मुंबई – वयाच्या 41व्या वर्षी आयपीएल खेळणारा प्रवीण तांबे, ज्यांची कारकीर्द अशा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, ज्यांना वाटते की वय हे नवीन गोष्टी सुरू करण्यात अडथळा आहे. 2013 मध्ये प्रवीण तांबे आयपीएलमध्ये पदार्पण करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला होता. आणि याच प्रवीण तांबेच्या आयुष्यवर आधारित काल एक सिनेमा प्रदर्शित झाला आहे.
“कौन प्रवीण तांबे?’ असे या सिनेमाचे नाव आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळण्यासाठी सतत 20 वर्षे वाट पाहिल्यानंतर प्रथम आयपीएल आणि नंतर मुंबईच्या रणजी संघात स्थान मिळवणारा प्रवीण आपल्या छोट्याशा कारकिर्दीत अनेकांना सातत्याने प्रयत्न करण्याच्या प्रेरणा या सिनेमातून देऊन जातो. दरम्यान, या सिनेमात मराठमोळा अभिनेता ‘श्रेयश तळपदे’ प्रवीण तांबे यांची मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे.
नुकतंच, कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंनी प्रवीण तांबे यांच्या बायोपिकचे स्पेशल स्क्रिनिंग पाहिले. स्पेशल स्क्रिनिंगच्या वेळी तांबे खूपच भावूक झाला असून, तो भाषणादरम्यान रडू लागला. आपल्या आयुष्यात घडलेले अनेक प्रसंग मोठ्या पडद्यावर पाहताना प्रवीण भारावून गेला होता. याचा व्हिडीओ केकेआरने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
“𝘕𝘦𝘷𝘦𝘳 𝘨𝘪𝘷𝘦 𝘶𝘱 𝘰𝘯 𝘺𝘰𝘶𝘳 𝘥𝘳𝘦𝘢𝘮𝘴, 𝘵𝘩𝘦𝘺 𝘥𝘰 𝘤𝘰𝘮𝘦 𝘵𝘳𝘶𝘦” 💜
🎥 Scenes from last night as the boys watched the inspiring #KaunPravinTambe at a special screening by @DisneyPlusHS! @legytambe #KKRHaiTaiyaar #IPL2022 pic.twitter.com/LKjABXk1Qj
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 1, 2022
सध्या प्रवीण तांबेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होता आहे. सिनेमा संपल्यानंतर प्रवीण जेव्हा काही बोलायला उठले तेव्हा ते भावुक होऊन म्हणतो… ‘स्वप्न पाहा, कारण स्वप्न एकदिवस नक्कीच पूर्ण होतात.’ त्यानंतर इतर खेळाडू प्रवीण यांच्या सिनेमाविषयी आणि त्यांच्या विषयी बोलताना दिसतात.