Gautam Gambhir| लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात आज 8 राज्यांतील 58 जागांवर मतदान होत आहे, ज्यामध्ये दिल्लीतील सात जागांवर मतदान सुरू झाले असून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे. दिल्लीतील सातही जागांवर भाजप आणि इंडिया आघाडीमध्ये थेट लढत आहे.
काँग्रेस आणि आम आदमी पक्ष युतीच्या अंतर्गत निवडणुकीच्या रणधुमाळीत आहेत. भाजपच्या विरोधात आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने संयुक्त उमेदवार उभे करण्याची ही पहिलीच वेळ आहे. ‘आप’ चार जागांवर निवडणूक लढवत आहे, तर उर्वरित तीन जागांवर काँग्रेस लढत आहे. Gautam Gambhir|
#WATCH | BJP East Delhi MP and former India Cricketer Gautam Gambhir casts his vote for the sixth phase of #LokSabhaElections2024 at a polling station in Delhi. pic.twitter.com/1dNMGyCoUq
— ANI (@ANI) May 25, 2024
नुकतेच टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर यांनी मतदानाचा हक्क बजावला. दिल्लीतील ओल्ड राजिंदर नगर येथील स्वामी दयानंद सर्वोदय कन्या विद्यालयात जाऊन गौतम गंभीरने मतदान केले. मतदान केल्यानंतर त्याने माध्यमांशी देखील संवाद साधला. मतदान करणे आपले कर्तव्य असून लोकशाही आणखी मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त लोकांनी घराबाहेर पडून मतदान करावे असे आवाहन गौतम गंभीरने केले आहे. Gautam Gambhir|
हेही वाचा:
“दिल्लीत हॅट्ट्रिक करू”; केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी व्यक्त केला विश्वास