Lok Sabha Election 2024 । ‘मी मतदान करण्यापूर्वी प्रार्थना केली आहे. मला जनतेला आवाहन करायचे आहे की, बाहेर या आणि मतदान करा. माझ्यासोबत माझ्या कुटुंबाचे आशीर्वाद आहेत. मला पाठिंबा आणि आशीर्वाद दिल्याबद्दल मी भाजप आणि पंतप्रधान मोदींचे आभार मानू इच्छितो.’ असे पुरी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संबित पात्रा मतदान करण्यापूर्वी म्हणाले. यावेळी ते पुरी मंदिरात पोहोचले
#WATCH | Odisha: BJP candidate from Puri Lok Sabha seat, Sambit Patra offers prayers at a temple in Puri. #LokSabhaElections2024 pic.twitter.com/UMBRTLMenG
— ANI (@ANI) May 25, 2024
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदानाला सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. या टप्प्यात सहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 58 जागांवर मतदान होत आहे. दिल्लीतील 7, उत्तर प्रदेशातील 14, बिहारमधील 8, पश्चिम बंगालमधील 8, हरियाणातील 10, झारखंडमधील 4, ओडिशातील 6 आणि जम्मू-काश्मीरमधील एका जागेवर मतदान होत आहे.
2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यात 62.2 टक्के मतदान झाले. 25 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 428 जागांवर पाच टप्प्यात मतदान झाले. आज सहाव्या टप्प्यातील मतदानानंतर सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी १ जूनला मतदान होणार असून त्यानंतर ४ जूनला निकाल लागणार आहे.
हे वाचाल का ?
सहाव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; ८८९ उमेदवारांचे भवितव्य पणाला
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सकाळीच मतदान केंद्रावर पोहोचले, दिल्लीत करणार मतदान
मतदानादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना केले खास आवाहन