Pratibhatai Patil Health Update| देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मागील काही दिवसांपासून प्रतिभाताई पाटील यांची तब्येत बरी नव्हती. मात्र त्यांना बुधवारी (ता. १३) जास्त अस्वस्थ वाटू लागल्याने कुटुंबियांना त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती असून २००७ ते २०१२ त्यांनी राष्ट्रपतीपद भूषवले आहे. प्रतिभाताई पाटील जळगाव विधानसभा मतदार संघातून निवडून आल्या होत्या. त्यांनी २० वर्षे वेगवेगळ्या खात्याची मंत्री पदाची जबाबदारी देखील सांभाळली आहे. Pratibhatai Patil Health Update|
राष्ट्रपती पदावर असताना प्रतिभाताई पाटील यांनी संपूर्ण जगात त्यांनी भारताची नवी ओळख करून दिली आहे. राज्यसभेच्या उपाध्यक्षा म्हणून त्यांनी जबाबदारी स्विकारली. १९९१ साली त्या अमरावतीतून लोकसभा सदस्य झाल्या होत्या. राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्या पुण्यात स्थायिक झाल्या आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी प्रतिभाताई पाटील यांची घेतली होती भेट Pratibhatai Patil Health Update|
दरम्यान, मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या पुणे येथील निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली होती. राष्ट्रपतीचा पदभार स्वीकारल्या नंतर पहिल्यांदा पुण्यात आल्याने प्रतिभाताई पाटील ह्यांनी त्यांचे पुणेकरांच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मूर्ती व शाल देऊन गौरव देखील केला होता.
हेही वाचा:
निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा महिला मतदारांवर ‘फोकस’; ‘नारी न्याय’ गॅरेंटी