पुणे: विश्वविजेता प्रशांत मोरे व जहीर पाशा यांनी आंतराष्ट्रीय कॅरम स्पर्धेमधील पुरुष एकेरीच्या साखळीत अपेक्षेनुसार आपले वर्चस्व कायम राखले.
प्रशांत मोरेने बांगलादेशच्या हिमायत मोल्लला 25-11, 25-09 असे पराभूत केले. जहीर पाशाने जोरदार सुरुवात केली. त्याने मालदीवच्या आदम आदिलला 25-04, 25-09 अशी मात दिली. प्रशांत मोरे आणि जहीर पाशा प्रमाणे इर्शाद अहमद आणि राजेश गोहिल यांनीही विनासायास विजय नोंदविले.
इर्शादने बांगला देशच्या मोहम्मद अली रॉबिनला 25-09, 25-03 तर राजेशने इटलीच्या निकोलो गॅल्लोला दोन्ही सेटमध्ये खातेदेखील उघडू दिले नाही. निशांतने फ्रान्सचा राष्ट्रीय विजेता पिएर दुबो याला 25-0, 25-02 असे एका अतिशय गतिमान लढतीमध्ये पूर्णपणे निष्प्रभ केले. या सर्व लढती पाचव्या फेरीतल्या होत्या. साखळीमधून 16 पुरुषांना उप-उपांत्यपूर्व फेरीत तर 8 महिलांना थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळेल.