Prashant Kishor On Mamata banarjee : पश्चिम बंगाल विधानसभेच्या मागच्या निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसला ज्या प्रमाणे यश मिळाले तसेच यश त्यांना आताही मिळेल असे काही जणांना वाटते आहे. मात्र त्यांनी असे मानणे ही मोठी चूक ठरेल असा इशारा राजकीय रणनीतीज्ज्ञ प्रशांत किशोर यांनी दिला आहे.
एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर म्हणाले की त्यांनी ममता दीदींसोबत दोन वर्ष काम केले आहे. निवडणुकीच्या काळात त्यांची भूमिका अगदी लवचिक असते. त्यांच्यासोबत काम करणे त्यामुळे सोपे होते. आता प. बंगालमध्ये भारतीय जनता पार्टी एक मोठी शक्ती म्हणून उदयाला येताना दिसते आहे. मागच्या वेळी मिळाले तसेच यश आपल्याला आताही मिळेल असे तृणमूलच्या काही नेत्यांना वाटते आहे. | Prashant Kishor On Mamata banarjee
त्यांना असेही वाटते आहे की भारतीय जनता पार्टी दुबळी झाली आहे. मात्र त्यांनी या भ्रमात राहणे चुकीचे ठरेल. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बंगालमध्ये ज्या प्रकारचा झटका तृणमूलला बसला होता तसाच झटका आताही त्यांना बसू शकतो. तृणमूलसमोर खूप मोठे आव्हान आहे आणि त्यांना योग्य नियोजन करूनच निवडणूक लढवावी लागेल.
संदेशखालीच्या घटनेमुळे तृणमूल कॉंग्रेसचे मोठे नुकसान होणार आहे. अशा प्रकारच्या घटना सरकारची प्रतिमा कलंकीत करण्याचे काम करत असतात असेही प्रशांत किशोर यांनी सांगितले. | Prashant Kishor On Mamata banarjee
निवडणूक रणनीतीज्ज्ञ म्हणून राजकीय पक्षांना सल्ला देण्याचे काम प्रशांत किशोर करतात. मात्र आता त्यांनी स्वत: ते थांबवले असून गेल्या १७ महिन्यांपासून ते बिहार या आपल्या राज्यात जनसुराज्य या अभियानात ते व्यस्त आहेत. बिहारमधील सर्व भागांचा त्यांचा दौरा सुरू आहे. मात्र त्यापूर्वी त्यांनी इंडियन पॉलिटिकल ॲक्शन कमिटी अर्थात आयपॅक या संस्थेची स्थापना केली असून या संस्थेचे काम मात्र जोरात सुरू आहे.
तृणमूलचे नेते आणि ममतांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी बंगालच्या निवडणुकांसाठी सल्लागार म्हणून आयपॅकची नियुक्ती केली आहे.आता आयपॅकची संचालन या संस्थेचे सह संस्थापक प्रतिक जैन करत आहेत. आयपॅकशी आपला काही संबंध नसल्याचे प्रशांत किशोर यांनी जाहीर केले आहे. मात्र जैन यांच्या म्हणण्यानुसार प्रशांत किशोर हे त्यांचे गुरू आहेत. | Prashant Kishor On Mamata banarjee
प्रशांत किशोर यांनी अलिकडेच तेलगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू यांची भेट घेतली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे २०१९ च्या निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी वायएसआर कॉंग्रेसचे जगनमोहन रेड्डी यांचे काम पाहिले होते व त्या निवडणुकीत चंद्राबाबूंची धुळधाण उडाली होती.