Sanjay Dutt On joining politics : देशभर लोकसभेची जोरदार धामधूम सुरु आहे. अशात अभिनेता संजय दत्त हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल यांच्या विरोधात कर्नालमध्ये निवडणूक लढणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या. अशात आता स्वतः संजू बाबाने निवडणूक लढण्याबाबत खुलासा केला आहे.
अनेक बॉलिवूड आणि टेलिव्हिजन स्टार्सनी राजकारणात प्रवेश केला आहे. कंगना राणौत,अरुण गोविल आणि गोविंदा यांसारखे चित्रपट कलाकार वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये सामील झाले आहेत. यातील काही स्टार्स 2024 ची लोकसभा निवडणूक देखील लढवणार आहेत. | Sanjay Dutt On joining politics
या सगळ्यात संजय दत्त पुन्हा एकदा राजकारणात येत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत होत्या. तो एका विशिष्ट राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवू शकतो, असा दावाही केला जात होता. मात्र, आता खुद्द संजयनेच राजकारणाच्या दुनियेत प्रवेश करतोय की नाही हे स्पष्ट केले आहे.
संजय दत्त राजकारणात येणार का?
संजय दत्तच्या कुटुंबाचा राजकारणाशी घनिष्ठ संबंध आहे. त्याचे वडील सुनील दत्त हे उत्कृष्ट अभिनेते आणि राजकारणी होते. सुनील दत्त काँग्रेस पक्षाच्या सरकारमध्ये मंत्री झाले. त्याचवेळी, संजयची बहीण प्रिया दत्तही अनेक वर्षांपासून राजकारणाचा भाग आहे.
अशा परिस्थितीत संजय दत्तही राजकारणात उतरणार असून, यावेळी तो लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या बातम्या येत होत्या. आता संजय दत्तने राजकारणात येण्याच्या वृत्तावर मौन सोडले आहे. | Sanjay Dutt On joining politics
त्याने त्याच्या अधिकृत एक्सवर पोस्ट करत आपल्या राजकीय प्रवेशाबाबत सांगितलं आहे.आपलय पोस्टमध्ये संजय दत्त म्हणतो,”जर मी राजकारणात जायचे ठरवले तर मी स्वतः ते जाहीर करेल. माझ्याबद्दल जे काही बातम्या येत आहेत त्यावर विश्वास ठेवू नका.”
I would like to put all rumours about me joining politics to rest. I am not joining any party or contesting elections. If I do decide to step into the political arena then I will be the first one to announce it. Please refrain from believing what is being circulated in the news…
— Sanjay Dutt (@duttsanjay) April 8, 2024
यामुळे सुरु झाल्या होत्या चर्चा
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल यांच्या विरोधात कर्नालमध्ये निवडणूक लढवण्यासाठी विरोधी राजकीय पक्षांना कोणताही मजबूत उमेदवार दिसत नाही. मनोहर लाल अजूनही कर्नालमध्ये सर्व संभाव्य उमेदवारांचा पराभव करत आहेत. काँग्रेसच्या पॅनेलमध्ये समाविष्ट असलेली नावे नाकारत पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व चित्रपट अभिनेता संजय दत्त यांना मनोहर लाल यांच्या विरोधात कर्नालमध्ये उतरविण्याच्या विचारात असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. | Sanjay Dutt On joining politics