Praniti Shinde VS Ram Satpute : भाजपकडून लोकसभेच्या उमेदवारांची पाचवी यादी आज जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील तीन जागांचा समावेश करण्यात आला आहे. यानुसार सोलापुरातून भाजपने काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या विरोधात राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे. | Praniti Shinde VS Ram Satpute
सोलापुरात सध्या भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी खासदार आहेत. जयसिद्धेश्वर स्वामींचं यावेळी तिकीट कापलं गेलं आहे. राम सातपुतेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. | Praniti Shinde VS Ram Satpute
भंडारा-गोंदियातून सुनील मेंढे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर गडचिरोली-चिमूर मतदारसंघासाठी अशोक नेते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अशोक नेते यांना भाजपकडून पुन्हा संधी देण्यात आली आहे.
The Central Election Committee of the Bharatiya Janata Party has decided on the following names for the upcoming General Elections to the Lok Sabha. Here is the fifth list. (2/3) pic.twitter.com/vA0hOQH4PV
— BJP (@BJP4India) March 24, 2024
कंगना राणावतला देखील उमेदवारी
काँग्रेसचे सदस्यत्व सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या नवीन जिंदाल यांनाही पक्षाने उमेदवारी दिली आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या तासाभरात कुरुक्षेत्रातून नवीन जिंदाल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली, तर कंगना राणौतच्या नावानेही सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. कंगना राणौतला हिमाचल प्रदेशातील मंडीतून भाजपची उमेदवारी देण्यात आली आहे. | Praniti Shinde VS Ram Satpute