Arun Govil | Lok Sabha Election 2024 । भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. या यादीत 111 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून त्यात अभिनेते अरुण गोविल आणि अभिनेत्री कंगना राणावत यांचा समावेश आहे. अरुण गोविल यांना उत्तर प्रदेशातील मेरठ या मतदारसंघातून भाजपनं तिकीट दिलंय.
त्यामुळे आता अरुण गोविल देखील भाजपकडून लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं स्पष्ट झालं. तर, अभिनेत्री कंगना राणावत हिमाचल प्रदेशातील मंडीतून लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. कंगना राणावतच्या नावाने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. । Arun Govil | Lok Sabha Election 2024
काँग्रेसचे सदस्यत्व सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या नवीन जिंदाल यांनाही पक्षाने उमेदवारी दिली आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या तासाभरात कुरुक्षेत्रातून नवीन जिंदाल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. । Arun Govil | Lok Sabha Election 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शनिवार 23 मार्च रोजी दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली होती. या बैठकीला भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सिंह यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. त्यावेळीच भाजपच्या पाचव्या यादीतील उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
कोणत्या राज्यातून किती उमेदवार? Arun Govil | Lok Sabha Election 2024
आंध्र प्रदेशातून सहा, बिहारमधून 17, गोवा-मिझोराम-सिक्कीममधून प्रत्येकी एक, गुजरातमधून सहा, हरियाणातून चार, हिमाचल-तेलंगणामधून प्रत्येकी दोन, झारखंडमधून तीन, कर्नाटक-केरळमधून प्रत्येकी चार जणांची घोषणा करण्यात आली. ओडिशातून, राजस्थानमधून सात, उत्तर प्रदेशमधून 13 आणि पश्चिम बंगालमधून 19 उमेदवार आहेत.