बॉलीवूड चित्रपट हंगामा 2 मध्ये वाणी कपूरची भूमिका करणारी अभिनेत्री प्रणिता सुभाष आई होणार आहे. पती नितीन राजूसोबत मुलाचे स्वागत केल्याचा आनंद अभिनेत्रीले सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केला आहे. अभिनेत्री प्रणिता प्रामुख्याने तेलुगु आणि कन्नड सिनेमांमध्ये दिसून आली आहे. प्रणिता सुभाषने 2021 मध्ये बंगळुरू येथील व्यावसायिक नितीन राजू यांच्यासोबत कुटुंबातील सदस्य आणि काही जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत एका खाजगी समारंभात लग्न केले आणि सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना याची माहिती दिली होती. दरम्यान अभिनेत्रीच्या घरी एक छोटा पाहुणा येणार आहे.
पती नितीन राजू यांच्या 34व्या वाढदिवसानिमित्त प्रणिता सुभाषने तिच्या प्रेग्नेंसीची गोड बातमी दिली आहे. अभिनेत्रीने तिच्या पतीसोबत रोमँटिक पद्धतीने सोनोग्राफी आणि प्रेग्नेंसी टेस्टिंग किटचे फोटो शेअर करून हा आनंद तिच्या चाहत्यांशी शेअर केला. तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून हे फोटो शेअर करताना प्रणिता सुभाषने एक क्यूट कॅप्शनही दिले आहे. आपला आनंद एका खास पद्धतीने शेअर करत तिने लिहिले, ‘माझ्या नवऱ्याच्या 34व्या वाढदिवसानिमित्त देवदूतांनी आमच्यासाठी एक भेटवस्तू दिली आहे.’
अभिनेत्रीने अनेक छायाचित्रे शेअर केली असून या फोटोंमध्ये ती तिचा नवरा नितीन राजूच्या कुशीत दिसत आहे. आणि तिच्या हातात तिचा सोनोग्राफी रिपोर्ट आहे. फोटोंमध्ये दोघेही हातात प्रेग्नेंसी टेस्ट किट धरलेले दिसत आहेत. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
प्रणिताने 2010 मध्ये कन्नड चित्रपट ‘पोर्की’मधून साऊथ चित्रपटांमध्ये पदार्पण केलं होतं. यासोबतच प्रणिताने तामिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्येही काम केलं आहे. 2021 मध्ये प्रणिता बॉलिवूड चित्रपट ‘हंगामा 2’ मध्ये दिसली होती. याशिवाय प्रणिता सुभाष अजय देवगन स्टारर ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’मध्येही दिसली आहे.