Prakash Ambedkar । मराठा आरक्षणासाठी मागसवर्गीय आयोगाचा अहवाल आला. त्यानंतर आरक्षण मंजूर करण्यासाठी 20 फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते. त्यापूर्वी या अहवालाच्या मसुद्याला राज्याच्या मंत्रिमंडळ मंजुरी दिली. विधिमंडळात हा मसुदा मांडण्यात आला. या विधेयकावर कोणतीही चर्चा झाली नाही. सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येत आरक्षण विधेयक विधानसभेत त्यानंतर विधान परिषदेत मंजूर झाले आणि विशेष अधिवेशान संपले. या विधेयकानुसार मराठा समाजाला शिक्षण आणि राज्य सरकारी नोकरीमध्ये 10 टक्के आरक्षण मिळणार आहे.
Prakash Ambedkar । नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर
विधानसभेत विधेयकाच्या बाजूने समर्थन देणाऱ्या विरोधकांनी मात्र सभागृहाबाहेर विधेयकाविरोधात भूमिका मांडली असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले,’मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक मंजूर करत असताना डुप्लिकसी झाली अशी परिस्थिती आहे. या विधेयकाला काँग्रेसने सभागृहात मान्यता दिली आणि बाहेर आल्यावर काँग्रेसच्या प्रतिनिधींनी विधेयकाविरोधात भूमिका मांडली. त्यामुळे काँग्रेसला नेमकं काय म्हणायचं आहे हेच कळायला मार्ग नाही.’
ते पुढे म्हणाले,’सरकारने १० टक्के आरक्षण दिलंय हे बरोबर आहे. पण कोणाला दिलंय याची अजून स्पष्टता नाही. मला असं वाटतं की या बिलाचं फार चांगल्या रितीने स्वागत होईल असं वाटत नाही.’ असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.