मुंबई – मागील महिन्याभरात औरंगजेबाचे स्टेट्स ठेवल्यावरून राज्यातील अनेक जिह्ल्यामध्ये दंगली झाल्या. अशात आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नुकतेच औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहून त्याचं दर्शन घेतलं. या दरम्यानचे फोटो सोशल व्हायरल होत आहे. या फोटोत आंबेडकर यांना फेटा बांधून त्यांचं स्वागत करण्यात आलं. थेट संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवानेच औरंगजेबाच्या समाधीच दर्शन घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. राजकरणही तापले आहे.
या व्हायरल होणाऱ्या या फोटोवरून आता भाजपसह शिंदे गटाने आंबेडकरांवर टीका केली आहे. काही हिंदुत्ववादी संघटनांनीही जोरदार टीका केली आहे. तर आंबेडकर यांच्या या कृतीमुळे ठाकरे गटाची कोंडी झाली आहे. मात्र आता ठाकरे गटाने आता याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
ठाकरे गटाचे नेते, खासदार अनिल देसाई यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या या कृतीवर म्हणाले,’प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष वेगळा आहे. औरंगजेबाच्या मजारीवर ते गेले हा वंचित बहुजन आघाडीचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याच्याशी आमचं काही घेणंदेणं नाही ‘ असं म्हणत त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केलं आहे.