Prakash Ambedkar । नुकतीच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुसाठी राज्यातील वंचितच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.
The Vanchit Bahujan Aaghadi is pleased to declare its first list of candidates from Maharashtra for the Lok Sabha elections.
• The VBA State Committee has decided to support the candidate of Indian National Congress from Nagpur
• The VBA State Committee has decided to… pic.twitter.com/gAkaAzudy7
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) March 27, 2024
वंचित बहुजन आघाडी राज्य कमिटीच्यावतीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नागपुरातील उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तर वंचित बहुजन आघाडी राज्य कमिटीने सांगलीतून श्री. प्रकाश शेंडगे (ओबीसी बहुजन पार्टी) यांना उमेदवारी दिल्यास त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा ॲड. प्रकाश आंबेडकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. रामटेक मधील उमेदवाराचा निर्णय आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत होईल.
मिळलेल्या माहितीनुसार,‘वंचित’च्या उमेदवारांना मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा राहणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडीच्या राज्य समितीने काँग्रेसच्या नागपुरातील उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
हे वाचक का ? भाजपने दिल्या सूचना,शिंदेंच्या 5 ते 6 खासदारांचा पत्ता होणार कट?