विद्यार्थ्यांना दिले शाडू मातीपासून गणेशमूर्ती साकारण्याचे प्रशिक्षण
पुणे – केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर देशविदेशांतील गणेशभक्त ज्या उत्सवाची आतुरतेने वाट पाहतात. तो गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. मूर्ती असो वा सजावट करण्यासाठी प्रत्येक गणेशभक्ताची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. आपली सजावट आणि आपला बाप्पा अधिकाधिक अप्रतिम दिसावा, यासाठी सर्वच प्रयत्नशील असतात. मात्र, गणेशोत्सव पर्यावरण पूरक नसेल, तर प्रदूषणामध्ये भर पडते. गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा, यासाठी दै. “प्रभात’ने यंदा “माणिकचंद’ प्रस्तुत “प्रभात ग्रीन गणेशा-2019′ ही शाडूच्या मूर्ती बनवण्याची कार्यशाळा दि. 30 ऑगस्टपर्यंत घेण्याचे ठरवले आहे. या उपक्रमाच्या दुसऱ्या दिवशी टिळक रस्त्यावरील “डीईएस सेकंडरी स्कूल’मध्ये हा उपक्रम पार पडला.