एसी आणि नॉन एसीच्या वर्गातील शुल्कात वाढ
नवी दिल्ली : रेल्वेच्या आयआरसीटीसी या संस्थेने रेल्वेच्या ई-तिकिटांवर सेवा शुल्क आजपासून पुन्हा लागू केला आहे. त्यामुळे आता रेल्वे प्रवास महागणार आहे. हे सेवा शुल्क आयआरसीटीसी मार्फत खरेदी केलेल्या तिकिटांवर लागू होणार आहेत.
आयआरसीटीसीने नॉन एसी वर्गाच्या प्रत्येक तिकिटावर 15 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे तर एसी वर्गाच्या प्रत्येक तिकिटावर 30 रुपये सेवा शुल्क लागू केले आहे. याबाबतचा आदेश आयआरसीटीसीने 30 ऑगस्टला लागू केला होता. वस्तू व सेवा कर वेगळा लागू राहील. सेवा शुल्क हे तीन वर्षांपूर्वी डिजिटल पेमेंटला उत्तेजन देण्यासाठी रद्द करण्यात आले होते. त्या वेळी नॉन एसी तिकिटांवर प्रत्येकी रुपये तर एसी तिकिटांवर प्रत्येकी 20 रुपये शुल्क आकारले जात होते. या महिन्याच्या सुरुवातीला रेल्वे मंडळाने आयआरसीटीसीला सदर सेवा शुल्क पुन्हा लागू करण्यास परवानगी दिली होती. ई-तिकिटांवर हे सेवा शुल्क लागू होणार असल्याने आता ही तिकिटे सप्टेंबरपासून महागणार आहेत.