वाघोली – महाराष्ट्र राज्य विद्युत ट्रान्समिशन कंपनीच्या वतीने लोणीकंद येथील 220 केव्ही सबस्टेशन इंटरकनेक्टर लाइनचे काम करण्यात येणार आहे. गुरुवारी (दि. 19) मध्यरात्री 12 पासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाघोलीसह, पेरणे, लोणीकंद, परिसरातील गावांमध्ये वीजपुरवठा विस्कळीत होणार असल्याची माहिती हडपसर विभागाचे उपकार्यकारी अभियंता अमित भरते यांनी दिली.
सबस्टेशनचे काम करताना मध्यरात्री 12 पासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत पॉवर ट्रान्सफॉर्मर 1 आणि 2 बंद राहतील, फक्त 3 नंबर ट्रान्सफॉर्मर सुरू राहणार आहे. एकाच पॉवर ट्रान्सफॉर्मरमधून विद्युत पुरवठा केला जाणार जाईल.
वाघोली, लोणीकंद, पेरणे, मांजरी, आव्हाळवाडी, केसनंद, साई सत्यम परिसर, फुलगाव, तुळापूर, पिंपरी सांडस, न्हावी सांडस आदी गावांचा विद्युत पुरवठा 17 तासांसाठी विस्कळीत होणार आहे.