बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. या खास दिवसानिमित्त त्याच्या आगामी “हिरोपंती-2′ चित्रपटाचे पोस्टर आणि रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. ही घोषणा टायगरच्या चाहत्यांसाठी मोठे गिफ्ट ठरले आहे.
View this post on Instagram
टायगर श्रॉफने “हिरोपंती’तून बॉलीवूडमध्ये डेब्यू केले होते. या चित्रपटाचे स्थान त्याच्या मनात अनन्यसाधारण आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. यात टायगरसह कृती सेननने मुख्य भूमिका साकारली होती. “हिरोपंती’मधील भूमिकेमुळे टायगरला एक वेगळी ओळख मिळाली होती.
View this post on Instagram
या चित्रपटाचा लवकरच सिक्वल येणार असून त्याचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये सुटेड-बुटेड टायगर हा दोन्ही हातांमध्ये गन घेऊन उंच बिल्डिंगच्या मधोमध कारवर उभा असलेल्या ऍक्शनमध्ये दिसत आहे. ही पोज चाहत्यांना खूपच आवडली आहे.
View this post on Instagram
या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला करत आहे. तसेच पोस्टरवर दिग्दर्शक अहमद खान आणि लेखक रजत अरोरा यांचे नाव दिसत आहे. तसेच 3 डिसेंबर 2021 अशी रिलीज डेट दर्शविण्यात आली आहे. हा चित्रपट सिनेमागृहातच प्रदर्शित करण्यात येणार आहे.